नमस्कार मित्रांनो, आज आपण कुणबी जात म्हणजे काय, त्यांचा काय इतिहास आहे, तसेच मराठा व कुणबी हे एकच आहेत का, कुणबी नोंद कशी शोधावी आणि कुणबी प्रमाणपत्र कसे मिळवायचे, या अश्या सर्व गोष्टीं बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संपूर्ण राज्यात कुणबी नोंदी शोधण्यात येत आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारने नवीन निर्णय घेतला आहे, त्यानुसार एखाद्या व्यक्ती कडे जर कुणबी नोंदी सापडल्या असतील तर, त्याच्या सर्व नातेवाईकांना देखील कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. हा निर्णय मनोज जरांगे यांच्या लढ्यानंतर अखेर घेण्यात आला आहे. याच अनुषंगाने आज आपण कुणबी जात म्हणजे काय? कुणबी नोंद कशी व कुठे शोधायची? कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे ? अशी महत्वाची माहिती या लेखातून जाणून घेणार आहोत. तुम्हाला ही जर ही माहिती जाणून घ्यायची असेल तर आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा…
कुणबी जात म्हणजे काय? त्याचा इतिहास काय?
मित्रांनो, कुणबीचा साधा सरळ अर्थ म्हणजे शेतकरी वर्ग किंवा शेतकरी जात. आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी समाज कुणबी म्हणून ओळखला जातो. कुणबी हा शब्द ‘कुण आणि बीज’ या शब्दांपासून बनला आहे. कुण म्हणजे लोकं आणि बीज म्हणजे बी. म्हणजेच एका पेक्षा जास्त बीज उत्पादन करणारे लोकं म्हणजेच शेतकरी लोकं. मित्रांनो, कुणबी लोकं सुरुवातीला पश्चिम- दक्षिण भारतात म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक या भागात राहत होते. पण जसजसा मराठा साम्राज्याचा विस्तार वाढत गेला तसतसा तो भारतभर पसरला आणि तिथून पुढे ते मराठे म्हणून प्रसिद्ध झाले.
शेतीची कामे आटोपुन नंतर युद्ध मोहिमेवर रवाना व्हायचे, हा कुणबी वीरांचा दिनक्रम होता. कुळवाडी भूषण शिवाजी राजांच्या काळातही मराठा सैन्य असेच अर्धवेळ लढाया मारीत. मग हाती सत्ता आल्या नंतर हेच कुणबी पुढे मराठे म्हणून नावारूपास आले.
मराठा व कुणबी एकच आहेत का?
मित्रांनो, पूर्वीच्या काळी शेती करणाऱ्या समाजास कुणबी असे म्हटले जात होते. तसेच महाराष्ट्रातील मराठे हे देखील शेती करत असत.त्याप्रमाणे बहुतांश मराठे हे कुणबी होते म्हणजेच शेतकरी होते. त्यामुळे सर्व मराठे तत्वतः मराठा कुणबी च आहेत हे मान्य केले जावू शकते. तसेच ब्रिटिश प्रशासकीय अधिकारी रॉबर्ट व्हेन रसेल यांनी त्यांच्या ‘द ट्राइब्स अँड कास्ट्स ऑफ द सेंट्रल प्रोव्हिन्सेस ऑफ इंडिया’ या पुस्तकात कुणबी हा समाजच मराठा असल्याचं म्हटलं आहे. तसेच वास्तविक पाहता मराठा व कुणबी या दोन भिन्न जाती नसून एकच आहे. 1881 च्या जनगणनेत मराठ्यांचा कुणबी मध्ये समावेश केला होता, म्हणजे 1881 ला सर्व मराठा कुणबी होते.
कुणबी नोंद कुठे शोधावी?
मित्रांनो, तुम्हाला जर तुमची कुणबी नोंद शोधायची असेल तर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असलेले तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, नगर परिषद कार्यालय अशा विविध कार्यालयात, तसेच ग्रामपंचायत स्तरावर सुद्धा ग्रामपंचायत कार्यालयात जन्म मृत्यू नोंदी, जुने गांवठाण मधील अभिलेखात तुम्हाला जातीची नोंद मिळू शकते. याशिवाय आपल्या सरकारने सुद्धा कुणबी नोंदी शोधण्याच काम हाती घेतला आहे. आणि त्यानुसार कलेक्टर ऑफिस च्या वेबसाईट वर या सर्व नोंदी जिल्हा नुसार पीडीएफ स्वरूपात त्यांनी लावलेल्या आहेत, त्या तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता.
मित्रांनो, खाली प्रत्येक जिल्ह्याची लिंक दिली आहे. तुमच्या जिल्ह्यानुसार लिंक ओपन करून त्यात तुम्ही तुमच्या गावानुसार तुमचे किंवा तुमच्या नातेवाईकांचे नाव तपासा. आणि कुणबी नोंदी शोधा.
- अकोला => https://akola.gov.in/mr/?&s=कुणबी
- अमरावती => https://amravati.gov.in/mr/?&s=कुणबी
- अहमदनगर => https://ahmednagar.nic.in/?&s=कुणबी
- कोल्हापूर => https://kolhapur.gov.in/?&s=कुणबी
- गडचिरोली => https://gadchiroli.gov.in/mr/?&s=कुणबी
- छत्रपती संभाजीनगर => https://aurangabad.gov.in/?&s=कुणबी
- जळगाव => https://jalgaon.gov.in/mr/?&s=कुणबी
- जालना => https://jalna.gov.in/?&s=कुणबी
- ठाणे => https://thane.nic.in/mr/?&s=कुणबी
- धाराशिव => https://osmanabad.gov.in/mr/?&s=कुणबी
- धुळे => https://dhule.gov.in/mr/?&s=कुणबी
- नंदुरबार => https://nandurbar.gov.in/mr/?&s=कुणबी
- नागपूर => https://nagpur.gov.in/mr/?&s=कुणबी
- नांदेड => https://nanded.gov.in/?&s=कुणबी
- नाशिक => https://nashik.gov.in/mr/?&s=कुणबी
- परभणी => https://parbhani.gov.in/mr/?&s=कुणबी
- पालघर => https://palghar.gov.in/?&s=कुणबी
- पुणे => https://pune.gov.in/mr/?&s=कुणबी
- बीड => https://beed.gov.in/?&s=कुणबी
- भंडारा => https://bhandara.gov.in/mr/?&s=कुणबी
- हिंगोली => https://drive.google.com/drive/folders/
- बुलढाणा => https://buldhana.nic.in/en/home-new-mr/kunbi-record/
- चंद्रपुर => https://chanda.nic.in/en/maratha-kunbi-record/
- गोंदिया => https://gondia.gov.in/en/kunbi-maratha-kunbi-kunbi-maratha-record/
- रत्नागिरी => https://drive.google.com/drive/folders/
- मुंबई उपनगर => https://mumbaisuburban.gov.in/mr/?&s=कुणबी
- मुंबई शहर => https://mumbaicity.gov.in/mr/?&s=कुणबी
- यवतमाळ => https://yavatmal.gov.in/mr/?&s=कुणबी
- रायगड => https://raigad.gov.in/?&s=कुणबी
- लातूर => https://latur.gov.in/?&s=कुणबी
- वर्धा => https://wardha.gov.in/?&s=कुणबी
- वाशिम => https://washim.gov.in/?&s=कुणबी
- सांगली => https://sangli.nic.in/mr/?&s=कुणबी
- सातारा => https://www.satara.gov.in/?&s=कुणबी
- सिंधुदुर्ग => https://sindhudurg.nic.in/?&s=कुणबी
- सोलापूर => https://solapur.gov.in/?&s=कुणब